|
दैनिक स्वगत ०७-०१-२०२०
राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का?
लोकमान्य बाळ
गंगाधर टिळक
यांच्या परकीय इंग्रज सरकार विरुद्धच्या त्या
ऐतिहासिक वाक्याचा आधार
घेत
आमचे
परमप्रिय माजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच स्वकीय सरकारबाबत वक्तव्य केले
आहे
. "सरकारचे डोके
ठिकाणावर आहे
का?". फडणवीस आदर्श मुख्यमंत्री
नक्कीच होते.
त्यांचे कर्तृत्व, वक्तृत्व आणि
सामाजिक दातृत्व वाखाणण्याजोगे आहे.
याबाबत आमच्या मनात
किंतु नाही.
उलट
ऐंशी
तासाच्या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीचा अंत
होत
असताना भारतीय जनता
पक्षाने एका
राजहंसाचा बळी
दिला
आहे
असे
भाष्य आम्ही केले
होते.
याबाबत अनेकांनी सहमतीही दर्शविलेली होती
व
आहे.
असो.
हे
सर्व
सांगण्याचे कारण
म्हणजे महाराष्ट्रात व
देशात जो
राजकीय उन्मत्तपणा उफाळून आला
आहे
तो
सर्वच देशप्रेमी नागरिकांना अस्वस्थ करणारा आहे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमुक्त भारत
या
घोषणेने आम्ही भारावून गेलो
होतो.
आम
जनतेनेही ही
त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला होता
व
आहे.
२०१४
साली
भारतीय जनता
पक्षाची जी
प्रगती दिसून आली
ती
त्यांच्या कर्तृत्वामुळे होती
असे
जर
कोणाचे मत
असेल
तर
ते
साफ
चुकीचे आहे.
तत्कालीन राजकीय पक्षांच्या विरोधात जो
रागाचा आणि
द्वेषाचा विस्फोट झाला
होता
त्याची प्रतिक्रिया ही
भारतीय जनता
पक्षाला मिळालेल्या मतात
होती.
हे
तो
पक्ष
जर
विसरत असेल
तर
त्याला दुर्दैव असेच
म्हणावे लागेल. नंतर
गावोगावी आणि
राज्या राज्यात भारतीय जनता
पक्षाची सरकारे स्थापन झाली.
त्यामुळे राष्ट्रप्रेमी असलेल्या आम
जनतेच्या मनात
एक
नवीन
आशा
निर्माण झाली.
याचे
हे
सारे
दृश्य परिणाम होते.
काँग्रेस विरोधात सर्वत्र असंतोषाचे वातावरण होते
व
त्या
वातावरणाने भारतीय जनता
पक्षाला संपूर्ण देशभर सत्ताधारी होण्यास मोलाची मदत
केली
होती.
आम
जनतेच्या या
भावनेचा आदर
राखून कार्य करण्याऐवजी भारतीय जनता
पक्षाने संपूर्ण देशभर प्रादेशिक पक्षांना संपविण्याचे धोरण
अवलंबिले. भारतीय जनता
पक्षाला "काँग्रेसमुक्त भारत"
पेक्षा "प्रादेशिक पक्ष
मुक्त भारत"
हे
धोरण
अधिक
मोलाचे होते.
हे
धोरणच त्यांना घातक
होत
चाललेले आहे
हे
आज
पदोपदी दिसून येत
आहे.
खरेतर २०१४
आणि
त्यानंतरच्या निवडणुकीत भारतीय जनता
पक्षाने प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी करीत
आणि
त्यांच्या सहकार्यानीच सर्वत्र सत्ता संपादन केली
होती
हे
निखळ
सत्य
आहे.
स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी माजी
पंतप्रधान अटल
बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेनंतर "शत-प्रतिशत भाजप"चा नारा दिलेला होता.
त्याला कोणीही आक्षेप घेण्याचे कारण
नव्हते. मात्र असे
राष्ट्रीय धोरण
असूनही भारतीय जनता
पक्षाला २०१४
साली
केंद्रस्थानी सत्ता स्थापन करण्यासाठी सर्व
प्रादेशिक पक्षांची मदत
घ्यावी लागली होती
हे
तीतकेच खरे
आहे.
एका
बाजूने काँग्रेस मुक्त भारत
असे
घोषवाक्य खांद्यावर घेत
सत्ताधीश झालेल्या भारतीय जनता
पक्षाने अनेक
राज्यांमध्ये काँग्रेसच्या अनेक
नेत्यांना जवळ
करण्यास सुरुवात केली.
तो
चाणक्यनीती चा
भाग
होता
का
अन्य
काही
धोरण
याचे
चिंतन भारतीय जनता
पक्षाने जरूर
करावे. पण तो
आत्मघात होता
हे
आमचे
मत
होते.
कालांतराने ते
सिद्ध होत
आहे.
काँग्रेस म्हणून जेव्हा संबोधले जाते
तेंव्हा त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि
या
व
अशा
काँग्रेस मधून
बाहेर पडून
स्थापन झालेल्या व
कार्यरत असणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांचा समावेश होत
असतो
हे
लक्षात घेतले पाहिजे.
भारतीय
जनता
पक्षाचा मतदार हा
डोळस
आहे
याचाच त्या
पक्षास विसर
पडला.
काँग्रेस पक्षामागे एक
आंधळा व
मतलबी मतदार आहे.
ज्याला देशाच्या तथा
महाराष्ट्राच्या हिताची जाण
नाही
व
बुजही नाही.
त्यांचे संपूर्ण राजकीय अस्तित्व हे
मुस्लिमधार्जिणे आहे
हे
उघड
आहे.
त्याकडे कानाडोळा करता
येणार नाही.
गेल्या सहा
महिने ते
एक
वर्षांमध्ये देशभरात भारतीय जनता
पक्षाची जी
पीछेहाट चालू
आहे
त्यास तो
पक्ष
स्वतः कारणीभूत आहे.
यात
दुर्दैवाची गोष्ट अशी
की
ज्यांचे पासून आम्ही देश
मुक्त करण्याचा विचार करीत
होतो
त्या
काँग्रेस पक्षाकडे सक्षम नेतृत्व नसतानाही देश
भरात
त्यांना यश
मिळत
आहे
व
पुन्हा सत्ता मिळत
आहे.
याला
कारण
कोण
व
काय
याचा
विचार करावा असे
कोणालाच वाटत
नाही.
मात्र जे
होत
आहे
ते
घातक
आहे.
तसेच
ते
भविष्यातील देशाच्या हिताचे नाही
हे
लक्षात घेतले पाहिजे. प्रादेशिक पक्ष
नेस्तनाबूत करण्याच्या भारतीय जनता
पक्षाच्या धोरणाने तो
पक्ष
स्वतःच कमकुवत होत
चाललेला आहे
व
हे
त्याच्या स्वतःच्या कर्माचे फळ
आहे
हे
त्याला ज्या
दिवशी समजेल तो
सुदिन असेच
म्हणावे लागेल. आज देशभरातील नव्हे तर
जगभरातील हिंदू भारतीय जनता
पक्षाकडे मोठ्या आशेने पाहत
होता
व
आहे.
ही
आशा
ठेवत
असतानाच त्याने भारतीय जनता
पक्षाचे आंधळे मतदार व्हावेत ही
जर
त्या
पक्षाची वैचारिक ठेवण
होत
असेल
तर
ते
साफ
चुकीचे आहे.
आज महाराष्ट्रात भारतीय जनता
पक्षाचा हिंदुत्वाच्या पाया
प्रमाणमानुन मित्र झालेला शिवसेना हा
पक्ष
त्यांचे पासून दुरावला आहे.
आम्हाला याचे
दुःख
नाही.
खरे
दुःख
आहे
ते
या
निमित्ताने काँग्रेस व
राष्ट्रवादी काँग्रेस या
पक्षांना जे
बळ
मिळाले त्याचे आहे.
हे
महाराष्ट्रासाठी आणि
देशासाठी घातक
आहे
हे
आम्ही स्पष्टपणे नमूद
करीत
इच्छीतो. आज मितीस भारतीय जनता
पक्षासह सर्वच राजकीय पक्ष
सत्तेच्या नशेत
गेलेले आहेत.
कोणाला जवळ
करावे, कोणाला लांब
करावे आणि
कोणापासून चार
हात
दूर
राहावे याबाबत सर्वसामान्य मतदार संभ्रमात आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी आपली
वैचारिक बैठक
आपमतलबी केलेली आहे.
मतदार जेव्हा मतदान करतो
तेव्हा तो
देशाचे व्यापक हित
डोळ्यासमोर ठेवून करीत असतो.
त्याची बूज
राखणे हे
प्रत्येक राजकीय पक्षांचे कर्तव्य आहेच
आहे.
पण
औट
घटकेचा राजा
अशी
भलावण झालेला हा
मतदार दुर्लक्षित करण्यासाठीच असतो.
त्याचे धोरणाला किंमत द्यावयाची नसते.
हे
सर्वच राजकीय पक्षांचे सामायीक वैचारिक धोरण
झाले
आहे
हे
आजमितीस दिसून येत
आहे.
राजकीय पक्षांचे हात्ती जी
सत्ता दिली
जाते
ती
या
देशाचे व
राज्याचे संरक्षण करणे,
हित
जोपासणे आणि
भारत
मातेच्या अस्मितेला संरक्षित करण्यासाठी असते.
आजमितीस महाराष्ट्रासह देशभर राजकीय पक्षांचे जे
वागणे चालू
आहे,
जे
विचार आहेत
आणि
जी
धोरणे ते
आखत
आहेत
नी
राबवत आहेत
ती
पाहता सर्वच राजकीय पक्षांना एक
समाईक प्रश्न विचारणे आवश्यक आहे.
तो
म्हणजे "राजकीय पक्षांची डोकी
ठिकाणावर आहेत
का?"
आमच्या लोकशाहीचे जर
असे
धिंडवडे राजकीय पक्ष
उडवणार असतील तर
लोकशाहीच्या संपूर्ण कार्यपद्धतीचा विचार व
पुनर्बांधणी करण्याचे कार्य आम
जनतेला हाती
घ्यावे लागेल असे
दिसते आहे.
निवडणूक विषयक नियमात फार
मोठे
बदल
करण्याची वेळ
आता
आलेली आहे
असे
सांगावेसे वाटते. कारण
राजकीय पक्ष
आणि
त्यांचे पदाधिकारी राज्याच्या व
देशाच्या होणाऱ्या नुकसानीस अजिबात जबाबदार धरले
जात
नाहीत. मग
या
लोकांच्या हाती
सत्ता का
द्यावयाची हा
मोठा
प्रश्न नजरेसमोर येत
आहे.
श्रीनिवास माधवराव वैद्य
चार्टर्ड अकाउंटंट - भ्रमणध्वनी
क्रमांक-९४ २०२ ६५६५६
|
Monday, 6 January 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment